STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

जिद्द...

जिद्द...

1 min
697

जिद्द...!

होतय होतय म्हणजे होतय

याची प्रचिती जेव्हा येते

तेव्हा कोठे जिद्दीची

खरी अनुभूती होते...

पाय ओढणारे बरेच

जीवनात सदा भेटतात

पण तेच खरे आपल्या

यशाचे आधार स्तंभ असतात...

भोवती पाय ओढणारे असतील

तर आपण इतके सक्षम बना

आणि दाखवून द्या की त्यांना

आपण हरणारा नाही कणा...

जेव्हा जिद्द जिंकण्याची अशी

विरोधातच खरी जन्म घेते

तेव्हा कोठे प्रयत्नाशी नाते जुळते

अन यश आपोआप पदरात पडते...

जिद्दीविना जन्म

निरर्थक आहे

विरोधातच खरे यश

आपले दडले आहे...

जिद्द धरावी जिंकण्याची

पराकाष्टा करावी श्रमाची

पेरणी करावी सातत्याची

गुरुकिल्ली हीच खरी उज्वल उन्नत यशाची...

ध्येयावरी लक्ष केंद्रित होता

आपोआप वेध घेतला जातो

लक्ष्याचा अचूक वेध घेता

इस्पित ध्येयाचा संकल्प साध्य होतो...!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational