ऊब मायेची...
ऊब मायेची...
ऊब मायेची....
माय राबे दिसभर
पोरासाठी घरासाठी
तिच्या जीवास नसे
कधीच आराम..
रातीला गारवा गुलाबी
सोबतीला मायेची सावली
जरी थकलेली शिनलेली
शिकवे बाळास माऊली..
थंडी झोंबताच फार
माय पेटवी शेकोटी
साऱ्या दिसाचा ञाण विसरुन
लेकासंगे करे गप्पागोष्टी...
गप्पा रंगती फार माय लेकाच्या
रंगवता रंगवता गोष्टी स्वप्नांच्या
काम करुनी नित्य जीवनी
बाळा मिळेल रे सफलता..
