STORYMIRROR

Pandit Warade

Inspirational

3  

Pandit Warade

Inspirational

चल चल बाळा

चल चल बाळा

1 min
343

प्रॉम्प्ट-११ साठी


चल चल बाळा तुला 

बोलविते तुझी आई।

शांततेने पाय टाक 

नको करू जरा घाई।।१।।


नको कशाची थोडीही

बाळा भीती मनी धरू।

तुझ्या सवे आहे मीही

चाल गड्या तुरुतुरु।।२।।


तुला एकट्याने इथे

नित्य फिरायचे आहे।

मस्त मोकळे पणाने

इथे चरायचे आहे।।३।।


राना वनात फिरून

चारा खाई पोटभर

जावे बाजूच्या तळ्याशी

पाणी प्यावे घोटभर।।४।।


अनुभव शाळा आई

शिकविते बाळा तुला

शिकवण थोर तुझ्या 

उपयोगी जीवनाला।।५।।


पंडित वराडे, औरंगाबाद

१२.०५.२०१९


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational