अंकगणित वेळेचे..
अंकगणित वेळेचे..
अंकगणित वेळेचे.....
जीवन गाणे गाताना
कित्येक अडचणी येती
जीवनी पदोपदी जगताना
वेळही टळुन गेली
काही केल्या कमी होईना
जबाबदारीचा संसार माझा
त्यातल्या संपता काही
वेळही निसटुन जाई
अडचणी संपुन जाता
सौख्य आले जीवनी
जगुया स्वत:साठी वाटता
वेळ गेली निघुनी
हळुहळु घडताना खरचं
वेळ हरवुन गेली
वेळेसोबत मी माञ
शिकले बरचं काही
जीवनात शिकुन कळलं
महत्व वेळेचं आता समजलं
गेलेली वेळ येत नाही परतुनी
हे माझ मलाच ऊमगलं..
गेलेली वेळ येत नाही परतुनी
हे माझ मलाच ऊमगलं..
*सौ.ऊर्मी (हेमश्री) घरत.पालघर*
8793621091
