ती....
ती....
खर तर ती एका लक्ष्मीच्या पावलांनी घरात येते.
पण कोण तिला लक्ष्मी समजते तर कोण ओझ.
कोण तिला हाताच्या फोडा प्रमाणे संभळत.
तर कोण तिचा द्वेष करत.
कोण कस हि वागल तरी
मात्र ती सगळ्यांना जीव लावते.
कन्यादान करताना मात्र
तिची किंमत सगळ्यांना समजत असेल.
लग्नाअगोदर छोट्या छोट्या गोष्टींचा हट्ट करणारी ती
लग्नानंतर समायोजनाच्या गोष्टी करायला लागते.
लग्नाच्या बेडीत अडकली की
ती दुसऱ्यांसाठी जगायला शिकते.
खर पुरुषांपेक्षा स्त्री श्रेष्ठ असते.
कारण एवढी लाडाने वाढलेले मुलगी
दुसऱ्यांच्या घरात जाऊन सगळा संसार सांभाळते.
आई, पत्नी, काकी, मामी, आजी
अश्या अनेक भूमिका ती पार पडते.
पण कुठ तरी ती कुटुंबाच्या सुखासाठी
स्वतःला गमवत असते.
घर सांभाळण्याच्या नादात.
ती स्वतःची स्वप्न बाजूला सारते.
सगळ्यांना आनंद देत ती त्यांची उन्नती करते.
