स्वतःवरच प्रेम
स्वतःवरच प्रेम
स्वतःशी प्रामाणिक राहील की
दुसऱ्यांच्या येणाऱ्या प्रतिक्रियाचा
फरक पडत नाहीं...
लोक काय त्यांच्या सवडीनुसार
त्यांचे विचार बदलतात
हो मध्ये हो मिळवल की चांगल
आणि हो मध्ये नाही असेल तर वाईट..
आपल्याला जे बरोबर वाटत
ते दुसऱ्याला चुकीचं वाटूच शकत..
सगळ्यांकडून चांगल्या गोष्टी घ्याव्यात
पण ते घेताना चांगल आणि वाईट
यातील फरक पण लक्ष्यात घ्यावा...
आजूबाजूला होणाऱ्या गोष्टींचा फरक पडावाच
पण त्याचा परिणाम किती दिवस असावा
हे आपल आपण ठरवाव...
आजकाल लोकांना दुसऱ्यांच्यात रमण
सोप्प जात पण स्वतःच्यात रमण
तेवढच आवघड...
जेव्हा सुख असत तेव्हा लोक सोबत असतात
दुःख असेल तर तिचं लोक
हाक मारून पण येत नाहीत...
स्वतःचा विचार करण नक्कीच वाईट नाही
पण आपल्यामुळे दुसऱ्यांना
त्रास होण हे नक्कीच चुकीचं आहे...
