STORYMIRROR

Shobha Wagle

Inspirational

3  

Shobha Wagle

Inspirational

ब्रम्हचारीणी

ब्रम्हचारीणी

1 min
119

ब्रम्हचारीणी

नवदुर्गेचे

दुसरे रूप

तपश्चर्येचे.


तपस्येमुळे

तपश्चा‍र‍िणी

फल प्राशन

व्रत धारिणी.


स्वाधिष्ठानाचे

चक्र स्थिरता

साधका मनी

कृपा ती भक्ता.


दुसरी माळ

नवदुर्गेला

महादेवाची

पत्नी उमेला.


निर्दोषपणा

शुद्ध-स्वच्छता 

रंग पांढरा

ही पवित्रता.


उपासनेने

देवी संतुष्ट

विजय प्रात्ती

ती सर्वोत्कृष्ट


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational