आयुष्यावर बोलू काही
आयुष्यावर बोलू काही
आयुष्य सुंदर आहे खरे रे,
डोळे उघडून पहा जरा,
उमललेली कळी कालची,
फुल बनले कसे अहा!!...
काळ्याशार मातीमधुनी,
रंग किती साकारती,
हिरव्या हिरव्या माळरानी,
सूख डोलते वाऱ्याशी...
रंग जाई-जुईचा निर्मळ,
गुलाब- बकुळीचा तो पहा,
गंध-रूप किती वेगळे,
निसर्ग नटला किती अहा!!...
सुंदर पाखरे किती पहावी,
जाती त्यांच्या किती किती,
प्रत्येकाचे ध्येय निराळे,
त्यांच्यासवे तू होई पक्षी ...
समुद्र लाटा असती अनंत,
तरी न ओलांडी कधी बंधन,
मनुष्य प्राणी किती लहानसा,
विशाल त्याच्यासमोर पहा...
पाऊस येई घेऊन साऱ्या,
मनमुक्त त्या सरीवर सरी,
मनमोकळे भिजून घेशी,
निसर्गाची किमया सारी...
निरागस ते बाळ चिमुकले,
बोल बोबडे त्याचे सुंदर,
मन होई किती अनावर,
घ्याया पापी त्याची सत्वर....
तरूण -तरूणींची कुजबूज,
प्रेम तयांचे किती अलवार,
तूही घे शोध जगात ह्या,
खरे प्रेम ते कुठले भूवर...
आयुष्य हे सरते भरभर,
काळवेळ ती जाई लवकर,
तूच जीवनाचा शिल्पकार,
जीवन करी तू एक महोत्सव...
