STORYMIRROR

Vijay Bhagat

Classics Others

4  

Vijay Bhagat

Classics Others

पंढरीचा राजा

पंढरीचा राजा

1 min
245

विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल

वारकरी भजनात गाती अभंग

विसरुनी जाती दुःख सारे

वारकरी भजनात होऊनिया दंग //१//


टाळ मृदंग हाती घेऊनी वीणा

दिंडीत नाचती धरुनी फेर

नाम विठ्ठलाचे नामाचा गजर

आषाढीला जाती भक्त सान थोर //२//


पांडुरंगाची आहे महिमा अपार

विठ्ठल आहे उभा विटेवरी

कर कटे वरी ठेऊनी हात

वसले पंढरपूर चंद्रभागे तीरी //३//


विठ्ठलाचे रूप जगी आहे अमर

कीर्तनातून सांगती संत विचार

एेकती पामर जाती विसरुनी दुःख

संतांचे माहेरं अवघे पंढरपूर //४//


सावळा विठ्ठल पांडुरंग माझा

चोहिकडे नावाचा आहे गाजावाजा

भक्तांची आस पुरवी पंढरीचा नाथ

नाथाचा हा नाथ पंढरीचा राजा //५//


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics