Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pandit Warade

Classics

4  

Pandit Warade

Classics

सारे संत जन

सारे संत जन

1 min
227

अर्पिती सकळ । तन मन धन ।।

सारे संत जन । जगासाठी ।।१।।

अडाणी अज्ञानी । रंजले गांजले ।।

मानिती आपुले । सकलांशी ।।२।।

सुख आणि दुःख । मानिती समान ।।

मान अपमान । सारखेच ।।३।।

संसारा पासून । सदा अनासक्त ।।

संन्यासी विरक्त । संत जन ।।४।।

सरळ बोलणे । सरळ चालणे ।।

सरळ वागणे । सज्जनांचे ।।५।।

दया, क्षमा, शांती । असे ज्यांच्या पाशी ।।

दाविती लोकांशी । मोक्षमार्ग ।।६।।

सांगे तत्वज्ञान । सकळ सिद्धांत ।।

देऊनी दृष्टांत । सोपे सोपे ।।७।।

हरती जनांचे । दुःख भव ताप ।।

संत माय बाप । कृपावंत ।।८।।

जन्म घेती संत । कल्याणा कारणे ।।

फिटले पारणे । *'पंडिताचे'* ।।९।।

Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics