STORYMIRROR

rajashree Wani

Classics

4  

rajashree Wani

Classics

ओंजळ

ओंजळ

1 min
261

भरभरून दिलेस देवा 

ओंजळीत माझ्या सुख 

स्वर्ग सुख लाभते मज 

विठ्ठला पाहता तुझे मुख...... 


नाम तुझे मुखी राहो 

व्हावी नित्य तुझी सेवा 

ओंजळीभर भक्ती माझी 

गोड मानून घेशील देवा..... 


तुळशी पत्र आवडे तुला 

भक्त सारे वाहती भावाने 

सुंगधीत परिमळ वाहे 

भक्तांच्या जीवनी प्रेमाने...


ओंजळीभर सुखाने देवा 

प्रत्येकाचा उत्कर्ष होवो 

दृष्कृत्य करण्याचा विचार 

कुणाच्याही मनी ना येवो..... 


एकदाच मिळाला मानवजन्म 

पूर्वजन्मीचे पुण्य आले हाती 

अहंकार नको या ओंजळीत 

मिळू दे सत्कार्य करण्या गती.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics