म्हातारं घर
म्हातारं घर


माझे आजोळचे घर
जरी झाले आज म्हातारे
त्याच्या छतावरीच आम्ही
पाहिले ध्रुव चंद्र तारे..
माया काय ती वर्णावी
प्रेम अगदी निष्पाप
किती पाहिले ते स्वप्न
नाही त्याचं मोजमाप..
मला आजही आठवते
बाबा पाढे पाठ घेती
गाणे आखाजीचे गाताना
सख्या वडाखाली झोका देती..
सुगंध ओल्या मृद्गंधेचा
हृदयी आजही दरवळे
आठवांचा वर्षाव होता
सुखद अश्रू नयनी गळे..
पंढरीच्या राजाच्या नामाने
घराच्या भिंती गाणे गाती
संस्कार आणि विश्वासाने
आजही जोडलीत घट्ट नाती..