STORYMIRROR

rajashree Wani

Inspirational

4  

rajashree Wani

Inspirational

अन सूर्य गवसला

अन सूर्य गवसला

1 min
263

शोध स्वतःचा घेत असताना 

मी कोण आहें प्रश्न विचारला 

मानवरूपात मी जन्मले अन

अन अचानक सूर्य गवसला..


शोधण्यास मजला संघर्ष

 अंधाऱ्या वाटेवर चालते

 लुकलुकणाऱ्या चांदण्यात 

 सुंदर स्वप्न उद्याचे पाहते.....


 जाणुनिया माझे अस्तित्व

 अंतरीचे सुर मला गवसले

 अंतरंगातील शुद्ध सुप्तगुण

 हळूहळू मजला समजले.....


ठरविले मी माझ्या मनाशी

देऊया स्वप्नांना उंच भरारी

घालूया छंदांना नव्याने साद

नित्य आव्हाने स्फूर्तीने स्वीकारी....


 जबाबदारी देखील संसाराची

 पेलवीन सातत्य चिकाटीने

अस्तित्व माझे जपण्यासाठी

जपेन छंदांनाही ताकतीने....


 आले कितीही संकटे तरी

 ताकतीनेच उभी राहणार

 करुनी मात कठीण प्रसंगी

 स्वप्न स्वाभिमानाचे पाहणार....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational