STORYMIRROR

rajashree Wani

Inspirational

4  

rajashree Wani

Inspirational

नारीशक्ती

नारीशक्ती

1 min
191

प्रेमाची तू स्वामिनी 


प्रेमाची तू स्वामिनी लावण्याची गं तू राणी

ओठी हसू नयनी पाणी अशी तुझी गं कहाणी...


झाशीची राणी तू रची शौर्याची अनोखी गाथा

जगताची माता तू सदैव चरणी तुझ्या गं माथा...


कन्या तू माता तू अनेक रूपांची आदिमशक्ती 

दुर्गा चंडी महिषासुरमर्दिनी तू विलक्षण भक्ती...


तूच तारिशी तूच रक्षिसी झटून तू संसारी 

नांदीशी संसारी सौख्यभरे छाया तुझी गं माहेरी...


कृतज्ञतेचा मानबिंदू तूच स्थिराविशी घराला 

कर्तव्यनिष्ठता तुझी सुखवी सबंध चराचराला...


रामाची सीता तू गवळण मुरलीधराची 

अमृतमयी संस्कारी धडाडी वीज गगनीची...


स्री जन्माचा स्वीकार कर ती प्रेमाचा महासागर

जीवनाचा तू आधारस्तंभ होई नित्येने तुझा जागर...


ममतेची दोरी तू विश्वाची शांती तुझ्यात झळकते 

निःस्वार्थ सेवेचे रूप उघडपणे तुझ्यात विहरते...


त्यागाची राणी आत्मविश्वासाची खाण तू 

घराचे मांगल्य देवघरातील पावित्र्य तू...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational