STORYMIRROR

rajashree Wani

Inspirational

4  

rajashree Wani

Inspirational

संत गाडगेबाबा

संत गाडगेबाबा

1 min
218

थोर संत महाराष्ट्र

भूमिमध्ये ते जन्मले

अनमोल ते जीवन

समाजासाठी अर्पिले..


स्वच्छतेचा मुलमंत्र

दिला त्यांनी गावोगाव

हाती झाडू घेऊनीया 

शुद्ध अंतरी तो भाव..


मुखी गोपाला गोपाला

मुखी मंत्र दिनरात 

देव दगडात नाही

शोध त्याला माणसात..


नित्य भजन कीर्तन 

अंधश्रद्धा निर्मूलन

ज्ञानदान ते अखंड

सामाजिक प्रबोधन..


ज्ञानदीप लावुनिया 

शिक्षणाचा हा प्रसार

जातीभेद नष्ट केला

नको कसली तक्रार..


सोनियाचा आज दिन

करू बाबांना वंदन

अशा महान पुरुषा

विनम्र अभिवादन..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational