आधुनिक काळातील कर्तृत्वान स्रिया
आधुनिक काळातील कर्तृत्वान स्रिया
एका हिरकणीने नाव बुरुजवार
कोरुणी इतिहास मोठा रचिला
आजची हिरकणी नभी भरारी
घेण्यास पदर ध्यासाचा खोचीला..
अनंत तिची रूपे स्त्री कर्तृत्वाची खाण
प्रेमाचा महासागर सदगुणांची ती राणी
लावण्याची मूर्ती ती मातृत्वाचा आधार
सुगंधी जखमा हृदयात तरी गोड तिची वाणी..
घर संसार सांभाळूनी जबादारीने ती
देश देखील तेवढाच प्रेमाने सांभाळते
ऑफिस वरुन घरी परतताच माऊली
लेकराला माय ममतेने कुशीत गोंजाळते..
नाही असे एकही क्षेत्र त्यात स्त्री नाही उभी
पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊनी वागते
चुल आणि मुलं ही संकल्पनेला सोडुनी
स्त्रीचे सामाजिक कार्य देखील ते महत्वाचे मानते..
आजची हिरकणी नाही कुणाला घाबरत
संकटानावर ती करते ती प्रकर्षाने मात
चंडिका दुर्गा आदिमशक्तीची ती मूर्ती
वंशाचा दिवा नसली तरी आहें ती समईतील वात..
