ने मजसी परत मातृभूमीला
ने मजसी परत मातृभूमीला


जन्मभूमी जगी माझी श्रेष्ठ
ने मजसी परत मातृभूमीला
परदेशी आलो प्रगतीसाठी
ओढ लागली जावे परतीला..
विविधतेतून नटलेली वसुंधरा
माझी प्राणप्रिय गोड भारतभूमी
काय वर्णावी शौर्याची ती गाथा
निघे धूर सोनियाचा ती जन्मभूमी..
जगी श्रेष्ठ ठरले भारतीय संविधान
सर्वधर्म समभाव मनी रुजविला
पवित्र भारत भूमीवरती जन्मले
थोर संत गोडवा अभंग वाणीला..
वीर हुतात्म्यांनी स्वातंत्र्यासाठी
हसत हसत दिले क्षणात बलिदान
सीमेवरती जवान पत्करुनी वीरत्व
परमवीरचक्र करती शौर्याचे परिधान..
गंगा यमुना पवित्र वाहती नद्या
सुजलाम सुफलाम हाचि देशतंत्र
भारतीय संस्कृतीचे गाऊ गोडवे
राम कृष्ण हरी हा मोक्षाचा राजमंत्र..