नारीशक्ती
नारीशक्ती
प्रेमाची तू स्वामिनी
लावण्याची गं तू राणी
ओठी हसू नयनी पाणी
अशी तुझी ग कहाणी ......
झाशीची राणी तू रची
शौर्याची अनोखी गाथा
जगताची माता तू सदैव
चरणी तुझ्या गं माथा.......
कन्या तू माता तू
अनेक रूपांची आदिमशक्ती
दुर्गा चंडी महिषासुरमर्दिनी
तू विलक्षण भक्ती........
तूच तारिशी तूच रक्षिसी
झटून तू संसारी
नांदीशी संसारी सौख्यभरे
छाया तुझी गं माहेरी.......
कृतज्ञतेचा मानबिंदू
तूच स्थिराविशी घराला
कर्तव्यनिष्ठता तुझी
सुखवी सबंध चराचराला........
रामाची सीता तू
गवळण मुरलीधरीची
अमृतमयी संस्कारी
धडाडी वीज गगनीची.......
स्री कर्तृत्वाची खाण
ती प्रेमाचा महासागर
जीवनाचा तू आधारस्तंभ
होई नित्येने तुझा जागर........
ममतेची दोरी तू
विश्वाची शांती तुझ्यात झळकते
निःस्वार्थ सेवेचे रूप
उघडपणे तुझ्यात विरहते.......
त्यागाची राणी
आत्मविश्वासाची खाण तू
घराचे मांगल्य
देवघरातील पावित्र्य तू........
