STORYMIRROR

मैथिली कुलकर्णी

Classics

4  

मैथिली कुलकर्णी

Classics

।। शिवसुता गजानना ।।

।। शिवसुता गजानना ।।

1 min
339

आधी नमन तुजला

विघ्नहर्ता गणपती...

शुभकारी प्रथमेशा

सारे तुला विनवती ।।


शिवसुता गजानना

शोभे मुशक वाहन...

प्रदक्षिणा मात पित्या

तुज बुद्धीचे रे धन ।।


तुझ्या स्वागता सजला

 मखर सुरेख छान....

लाडू मोदक आवडे

हाच नैवेद्याचा मान ।


माघ शुक्लपक्षी तुझी

करू साजरी जयंती....

चतुर्थीला मिळुनीया

गाऊ गणेशा आरती ।।


आळवणी तुजला रे

आता मागणे एवढे....

कृपादृष्टी सर्वांवर

तुला घालते साकडे ।।


कर्ता तूच करविता

पायी शिष झुके तुझ्या...

सार्थ व्हावे आयुष्य हे

दान झोळीत दे माझ्या।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics