चाहूल थंडीची....
चाहूल थंडीची....
चाहूल थंडीची
चाहूल थंडीची
वर्षाच्या सगळ्यात
मोठ्या दिवाळी सणाची
पहाटे पहाटेच्या
सडा-रांगोळीची
चाहूल थंडीची
घरादाराचा कोपरान कोपरा
सारा उजळून काढण्याची
आकाशकंदीलाची
गरमा-गरम चविष्ठ
गोडाच्या फराळाची
चाहूल थंडीची
वसुबरसेची
अमृताची धार देणाऱ्या
सवत्स धेनूस पूजण्याची
चाहूल थंडीची
धनत्रयोदशीची
धना सोबतच
आरोग्य सांभाळण्याची
धन्वंतरीस नमन करण्याची
चाहूल थंडीची
नरकचतुर्दशीची
पहाटे अभ्यंग स्नान करून
घरात सर्वत्र दिप लावण्याची
चाहूल थंडीची
लक्ष्मीपूजनाची
सोन्याच्या पावलांनी
येणाऱ्या लक्ष्मीचे
पूजन करण्याची
चाहूल थंडीची
बलिप्रतिपदेची
व्यापारास आरंभ करण्याची
बळीराजाप्रमाणे आचरणाची
चाहूल थंडीची
यजमानांना औक्षणं करून
पाडव्याची ओवळणी
लाडाने मागण्याची
चाहूल थंडीची,
भाऊबीजेची
लगबग माहेराला जाण्याची
हक्काची भाऊबीज घेण्याची
चाहूल थंडीची
सणावाराला साऱ्या
घरादारास एकोप्याने
बांधून ठेवण्याची
सुख-सौख्याची
आनंद भरभराटीची.
