बाळूमामा
बाळूमामा
मनुष्यरुपी घेऊनी अवतार
महादेव आले करण्या जग उद्धार
जन्मले बाळूमामा अक्कोळी
मयप्पा अन् सुंदराच्या घरी
मस्तकी रेशमी फेटा अन् हातात घुंगरांची काठी
बाळूमामाचं नाव साऱ्यांच्या ओठी
मुक्या प्राण्यांवर केली त्यांनी माया
साऱ्या भक्तांवर त्यांच्या कृपेची छाया
बाळूमामा बनले मेंढरांचे वाली
झाले ते दिनदुबळ्यांचे स्वामी
चरण स्पर्शाने त्यांच्या पावन झाली ही धरती
त्यांचा सहवास लाभला भक्तांना अदमापुरी
दाखवित ते साऱ्यांना चमत्कार
बाळूमामांचा महिमा असे अपरंपार
