STORYMIRROR

astik parihar

Classics

4  

astik parihar

Classics

अनुभव नात्यातला...

अनुभव नात्यातला...

1 min
290

सहज चालता चालता कधी

हाय बाय करून घ्यावं,

दुरवर जाणाऱ्यांना थोडं

आपलेपणाची जाणीव करून द्यावं...


नात्यांच्या खेळात अडकून

थोडं खेळ खेळुन बघावं,

आपले आहेत ते त्यांना

थोडं वेळ देऊन बघावं...


त्यांनाही चुकीची जाणीव 

वेळ आल्यावर होईल,

मतलाबीपणाचा बहाव जेव्हा

दुरवर घेऊन जाईल...


 नात्यांचा गुंता कायमचं 

हसत खेळत राहिल,

आपसातले मतभेद दूर करून

नाती टिकवीली जाईल.....


येतील सर्वच परत आयुष्यात

जेव्हा त्यांना अनुभव होईल,

नात्यांच्या सुटलेल्या गाठीत

जेव्हा त्यांना अडकवण्यात येईल...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics