STORYMIRROR

astik parihar

Romance

4  

astik parihar

Romance

जीवनात माझ्या

जीवनात माझ्या

1 min
142

प्रेमाची झुळूक माझ्याही जीवनात यावी

हवेहवेसे क्षण मलाही देऊन जावी

कधी हसवावी कधी रडवावी

एकदा तरी प्रेमाची झुळूक माझ्याही जीवनात यावी...

दोन मन एकत्रित जुडावी

कधी माझ्यापासून दूर जावी

कधी आपलं समजून जवळ घ्यावी

एकदा तरी प्रेमाची झुळूक माझ्याही जीवनात यावी...

आहे इच्छा सोबतीला घेऊन फिरावी

कधी हे ठिकाण तर कधी ते ठिकाण 

फिरण्यासाठी आधी ती मिळावी

एकदा तरी प्रेमाची झुळूक माझ्याही जीवनात यावी...

साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance