देव पाहिला रुपात
देव पाहिला रुपात

1 min

18
सिमेवर जो वीर योद्धा लढतो
त्यालाच आम्ही रक्षक मानतो,
आपल्या जिवाची पर्वा न करता शत्रुशी लढतो
त्यालाच आम्ही देव समजतो....
जनसामान्यांच्या सुरक्षेची जबाबदारी
लोकांच्या मधात राहुन घेतो,
अवघडात अवघड प्रश्न मिटवितो
त्यालाच आम्ही देव समजतो....
पांढ-या शुभ्र वस्त्रात न
दिसणाऱ्या शत्रुशी झुंज देतो,
शरिराच्या वेदना नष्ट करून दूर करतो
त्यालाच आम्ही देव समजतो....
दिवस-रात्र राब राबतो
सर्वांच्या भुकेची चिंता दुर करतो,
शेतीत घाम गाळून अन्न पिकवितो
त्यालाच आम्ही देव समजतो...
जगात माणुसकीच सर्वापरी मानतो
पिडितांचे दुःख न सांगताच जाणतो,
माणसातलं माणुसपण ओळखतो
त्यालाच आम्ही देव समजतो..