शिव वंदना गाऊया
शिव वंदना गाऊया
जयंतीच्या उत्सवाला
शिव वंदना गाऊया
हदःयस्थ शिवबाची
स्तुती पुष्पे उधळूया.......१!!
जन्म शिवनेरी गडा
उल्हासीले दरबार
सजवले महालाला
झुले तोरणाने द्वार........२!!
जिजाऊचे पुत्र रत्न
किर्तीवंत ठरलेत
न्याय निष्ठा सांभाळून
राजे खरे बनलेत......३!!
युध्दकला नेमबाजी
प्रशिक्षित युवराज
अंगावर येता शत्रू
युक्तिवादी असे बाज........४!!
परिस्थिती पालटण्या
रणनीती आखियली
स्वराज्याची पूर्ती होण्या
तलवार काढियली.........५!!
एक होता शूरयोद्धा
मुखी शिवबाची सय
महाराष्ट्र राज्यी आता
नाही उरलेत भय...........६!!
