STORYMIRROR

Pratima Kale

Inspirational

3  

Pratima Kale

Inspirational

राजे जन्मास यावे पुन्हा

राजे जन्मास यावे पुन्हा

1 min
233


महाराष्ट्राचे भाग्य उजळण्यास 

शिवनेरीवर दिन उगवला सोनियाचा 

ढोल,ताशाच्या गजरात भोसलेघराणी

शिवबाचा जन्म सोहळा जल्लोषाचा...


हिंदवी स्वराज्याचे ध्येय उंचावण्यास

दादाजी कोंडदेव जीवनी लाभले गुरू

राजकारण,युद्धाचे डावपेच समजावून

ध्येय बाळगून अनमोल कार्य केले सुरू....


हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यास

प्रेरणा दिली जिजाऊंनी कथांतून शिवबास

जाणता राजा प्रतिमा फडके गगनात

प्रेमळ,निर्मळ स्वराज्याची जपता आस....


शिलवंत,प्रजाहितदक्ष,क्षत्रियकुलवंत

ज्यांसाठी नसानसात सळसळे रक्त

स्वराज्य प्रणेते,कर्तव्य दक्ष, विचारी 

 सिंहासनाधीश्वर शिवबाचे आम्ही भक्त...


जय भवानी,जय शिवाजी गर्जना 

निरपेक्ष ,न्यायी,धर्मरक्षणकर्ता राजा

हर हर महादेव बोलीने कार्य करती

दरी कपारीतील मावळे रुपी प्रजा...


मातृभक्त,सह्याद्रीचा प्रखर निखारा

ज्याची उराउरात आपुलकीची जागा

शेकडो वर्षानंतरही मनामनात थोर

कर्तृत्वाचा,कर्तव्याचा जपला जातो धागा......


संस्कारी,विनयशील,रयतेचा वाली, शूर

स्त्रियांचा आदराने करी मातेसम सन्मान

संस्थापक,जनतेचा राजा,तेजस्वी तारा

आदर्श महामेरूचे करू किती गुणगान...


राजे तुम्ही जन्मास यावे पुन्हा भुवरती 

गाडण्यास जातीवाद,अंधश्रध्दा,रुढी प्रथा

आत्महत्या टाळण्या,भ्रष्टाचार दूर करण्या

जाणून घेण्या स्त्रीमनाच्या धगधगत्या व्यथा....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational