क्रांती
क्रांती
माणूस म्हणून जन्मा आला
का मानतो तू जीवनात भेद
भारताचे सुज्ञ नागरिक सारे
द्या क्रूर अशा विचारांना छेद ||१||
कार्य तृप्ती आनंदाने साजरा
मुलगा-मुलगी माना समानता
दोघांना देवून हो मान-सन्मान
दाखवा कर्तव्यातून मानवता ||२||
उद्याची स्वप्ने साकार करण्यास
उजळावी घरोघरी पणती खास
आनंदाची, सुखाची, प्रगतीची हो
घ्यावा मानवाने जीवनात ध्यास ||३||
नका समजू वंशाचा दिवा मुलगा
म्हातारपणाची काठी असते लेक
तिला शिक्षण देवून, पायावर उभी
करून करा कार्य जीवनी हो नेक ||४||
उज्ज्वल क्रांती करण्याची मशाल
घेवू हाती हो एकोप्याने जीवनात
हुंडा प्रथा बंद, स्त्री भ्रुणहत्या आता
ठेवू एकमेकांना सदा हो आनंदात ||५||
