प्रीतवेल
प्रीतवेल
नारीशक्ती अफाट विचारी
जाणीव जपे अस्तित्वाची
प्रगतीच्या हो वाटचालीस
साठवण निर्मळ प्रेमाची..
कर्तव्यदक्ष तू प्रामाणिक
घेई उंचच गगनी भरारी
ध्येय गाठण्यास अबोल
क्रांतीकारक जणू करारी.....
ज्ञानज्योत प्रज्विण्यास
धरली शिक्षणाची कास
प्रगतीची वाट चाखण्या
उरी बाळगे जीवन आस...
दशभुजा स्वरूप हे तुझे
भासे देवी कठोर कष्टाची
मायेची ओंजळ भरुन हो
मुहूर्तमोड रोवते उद्याची...
आई,बहिण अन् प्रियसी
पत्नी,मैत्रीण तू हक्काची
सुखाची वाट चालण्यास
नाते निभवती भावनांची...
पुण्यवान,किर्तीमान मुर्ती
झुळूक शितल वाऱ्याची
मानवी जीवनाची जननी
जाण ठेवावी अस्तित्वाची...
नात्यांची वीण गुंफूनी घट्ट
प्रीतवेल बहरते जीवनाची
पणती बनून प्रकाशण्यास
नाळ जोडे दोन कुंटुंबाची...
