क्रांतीज्योती
क्रांतीज्योती
1 min
372
क्रांतीज्योती सावित्रीने
दिला ज्ञानाने आकार
दार खोलुन शिक्षण
केले विचार साकार ||१||
बुरसट विचारांना
खऱ्या अर्थी मिटवले
महिलांचे भवितव्य
शिक्षणाने घडवले ||२||
नित्य झेलून विरोध
नाही घेतली माघार
पती सहकार्यानेच
केले सत्कार्य प्रसार ||३||
धैर्यवान ,पुण्यवान
साऊ शिक्षिका बनली
शेण ,चिखल झेलून
ठरे स्त्रीयांची सावली ||४||
कर्तृत्वाने,कर्तव्याने
घडविला इतिहास
उरी जपला प्रखर
शिक्षणाचा सदा ध्यास ||५||
