चाहूल
चाहूल
1 min
347
चाहूल लागता पावसाची
मन माझे सुखावले खरे
त्याच्या तृप्तीने वसुंधरा
दशदिशा उल्हासित करे..
मोहरले,बावरले मन हे
तुझ्या संगे प्रेम बरसले
अलगद,भाव जीवनी
नभ अन् धरेचे जुळले..
उत्कटतेने सरसावला
थेंब धरेस बिलगला
शांत करण्या काया
धरेवरती विसावला |
प्रेमाचा मृदगंध सारा
दरवळला दशदिशा
पवन घाली शीळ ती
झाली भोवताली निशा...
बळीराजा सुखावला हो
पडे धरेवर पाऊसधारा
सर्जाराजा संगतीने हो
गाणे गाई शीतल वारा ...
शांत, तृप्त करण्यास तो
आला असा खरासा अवेळी
उष्ण धरा करता शीतल
समजावी योग्यता वेळी..
