तुळसी विवाह
तुळसी विवाह
अंगणात सजावी तुळस
आरोग्यदायक जीवनात
कृष्णप्रिया भाग्यवान ही
प्रभाती प्रदर्शना करूयात..
कार्तिकी पौर्णिमेचा सण
साजरा करू सारे थाटात
प्रेम आशीर्वाद घेवू आता
महत्त्व तिचेच जीवनात..
जणू कल्पतरू तुळसीमाय
करू तुळसी लग्न सोहळा
प्रबोधन एकादशी सुरुवात
पौर्णिमेला आज आगळा....
दिन हो कार्तिकी पौर्णिमेचा
त्रिपुरारी पौर्णिमा उत्साहाची
नवरदेव सजला भारीच सारा
वेळ ठरली खास मांगल्याची....
वऱ्हाड मंडळी जमली दारी
तोरण,पताका सजले अंगण
रांगोळी,सडा टाकून आनंदी
पाहुण्यांनी हसले,बहरले रिंगण...
साज शृंगार करून आली ती
चढली अखेरीस बोहल्यावर
आंतरपाट धरताच भटजीने
अक्षता ही पडल्या डोक्यावर...
मंगलअष्टका सुस्वर गाताच
वाढल्या जेवण पंगती खास
रितीरिवाज सारे करुनी मग
जाई आपुल्या वराती घरास ..
