अनाथांची माय
अनाथांची माय
सिंधुताई सपकाळ हो
अनाथांची माय हरपली
दुधावरची साय झाली
कायमची ती दुरावली ....१
पोरके करून आता
आमच्यातून निघूनी गेली
दुःखीकष्टी जीवन जगली
आयुष्यभर कडू बोल झेली..२
विश्वाची माय ही
अन्नदाता हरपली
अबोलपणे, खंबीरपणे....
अपार दुःखे भोगली....३
अविरतपणे जीवनात
केले अनेक संस्कार
अनमोल विचार मांडले
मनोमनी दिला आकार....४
जाणून दुःखे भावनेत
यातना भोगूनी पाहिल्या
माय बनून जगी सांगते
जीवन काहिल्या..५
लाखो संसार तीनेच
उभारले या जगी
जीवन साकारले
जगताची गुण अंगी....६
क्षणोक्षणी आठवणी
हृदयी दाटतात
तुझी माणुसकी वृत्ती
अबोल मन चिरतात...७
अनामिक हुरहुर
मनास लागली आता
जीवन जगली ती माय
काळोखी रात्रीत विझली माता..८
