STORYMIRROR

Pratima Kale

Others

4  

Pratima Kale

Others

अभिवादन

अभिवादन

1 min
395

सावित्रीने पेटविली ज्योत

ज्ञानाची अखंडित महान

विश्वात गौरविली अखंड

ज्ञानदान वाटचाल शान......


ज्ञानकण वेचून रचियला

अबोल शिक्षणाचा पाया

शेण,चिखल,दगड झेलून

बनली महिलांची  छाया....


शिक्षणाने बनून ती सक्षम

दरवळला सर्वत्र किर्तीगंध 

माणुसकीची नाती जोडून

वाहे कर्तृत्व सिद्ध प्रीतगंध.....


मोल शिक्षणाचे जाणुनी

ज्ञानगंगा वाहे जीवनात 

कस्तुरीमृग जपू कार्याने

जगण्यास तो उल्हासात.....


माया,प्रेम,ममतेची खाण

सावित्रीस करूया वंदन

जीवनात तिने फुलविले

माणुसकीचे हो नंदनवन.....


विचारांना देवून आकार

झिजली कणखर  चंदन

तुझ्या अथक परिश्रमांना

प्रतिमा करते अभिवादन....


Rate this content
Log in