तुझी माझी भेट
तुझी माझी भेट
1 min
356
तारुण्याच्या उंबरठ्यावर
तुझी माझी भेट जिवलग
धुंद प्रीत काव्याने,पाव्याने
राधेसम भाळले अलगद ||१||
कृष्ण माझा,राधा प्रीतवेडी
एक श्वास दोन जीव असे
एकांती हो मिलन समया
मनीचे भाव नयनी वसे ||२||
मनोमन वरले तुजला
दगा नको मज जिवलगा
तूच जीवनी नित्य असावा
हृदयी प्रतिमाची जागा ||३||
झुरते मन माझे वेडेपिसे
कर तृप्त मन मिलनाने
नखशिखांत न्हाले सख्या
काया भिजली अशी प्रेमाने ||४||
