Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sangita Pawar

Inspirational

3  

Sangita Pawar

Inspirational

अडीच अक्षरे प्रेमाची

अडीच अक्षरे प्रेमाची

1 min
159


अडीच अक्षरे प्रेमाची

आहेतच सगळ्यात न्यारी

आयुष्य सारे नश्वर आहे

म्हणूनच ही अक्षरे प्यारी ||


प्रेम म्हणजे नाही फक्त

हातात हात घालून फिरणं

दूर राहूनही प्रेम म्हणजे

प्रियकराच्या काळजात शिरणं ||


प्रेम म्हणजे खरे तरअसते 

आपल्या नशिबाचं लेणं

दूर राहूनही एकमेकांना

प्रेमाने समजून घेणं ||


प्रेम म्हणजे नाही केवळ

शरीर स्पर्शाला भिडणं

प्रेम म्हणजे त्याला येणाऱ्या

संकटाशी अप्रत्यक्ष लढणं ||


प्रेम म्हणजे प्रीयकराला

शेवटच्या श्वासापर्यंत जपणं

प्रेम म्हणजे आठवणींच्या

पावसात मनसोक्त भिजणं ||

 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational