STORYMIRROR

Sarika Jinturkar

Inspirational

3  

Sarika Jinturkar

Inspirational

वीर शिरोमणी महाराणा प्रताप

वीर शिरोमणी महाराणा प्रताप

1 min
206

कुंभलगड ज्यांचे जन्मस्थान 

माता जयवंताबाई, वडील राणा 

उदयसिंह होते खुप भाग्यवान


 मातृभूमीप्रती निष्ठा, अतुलनीय साहस अन् आपल्या अद्भुत शौर्यामुळे मुघल साम्राज्याच्या 

सत्तेला ज्यांनी दिले आव्हान  

कर्मवीर, शूरवीर महाराणा प्रताप मेवाडचा असे अभिमान 


 अत्यंत कुशाग्र बुद्धी दुसऱ्यांच्या मनातले भाव ओळखण्याची अतींद्रियशक्ती 

प्रजाहितदक्ष, अत्यंत कर्तबगार  

 सूर्य मेवाडचा, राजस्थानच्या शूरवीरांचा असे आधार  


क्षत्रिय वीर शिरोमणी 

ज्यांचा भाला 

पडत होता अत्याचारी शत्रूंवर भारी "हर हर महादेव" ची गर्जना करत कुशाग्र घोडा "चेतक" वर जे करत होते स्वारी  

"रामप्रसाद" हत्तीने ही साथ दिली त्यांना खरी


 भौतिक साधनांचा करून त्याग 

मातृभूमीच्या रक्षणासाठी जंगलात कित्येक वर्ष राहाले आले किती संकट 

ना घेतली कधी माघार  

लढतांना जखमा झाल्या तरी केला गनिमावर पलटवार  


धन्य झाली ती हळदी घाटी बघूनी शत्रूचा संहार


अखेरच्या श्वासापर्यंत लढण्याची प्रतापांची झुंजार वृत्ती कुशल नेतृत्व, प्रचंड देशभक्ती  

अकबर या मुघल शासकाने सुद्धा 

ज्यांच्यावर मुक्त मनाने शब्द सुमने वाहिली 

प्रताप होते पशुप्रेमी, प्रजाप्रेमी न्यायी


प्रजेच्या कल्याण्यासाठी केला संघर्ष, दिले बलिदान  

अश्या वीर योद्धा महाराणा प्रतापांना शतशः प्रणाम

 ज्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत देश बनला महान 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational