प्रेम मातेचे
प्रेम मातेचे
माता अपत्याचे नाते
असे अतीव प्रेमाचे
जीव व्याकुळ मातेचा
बाळ हो घरकुलाते
विनवण्या गेल्या व्यर्थ
कुणी ऐकेना मातेस
केली प्रयत्नांची शर्थ
नाही पाझर दयेस
माता मनी चिंतावली
धाडसास सज्ज झाली
दोर कड्यासी बांधुनी
काया झोकुनी दिधली
जखमांनी भरे अंग
नसे पर्वा शरीरासी
नाग साप वाटेमधे
तिचे मन बाळापाशी
धाडसाने कडे पार
घेई घराकडे धाव
हिरकणी तू आदर्श
राजे गौरविती माय
