शिवाजी राजे
शिवाजी राजे
माँसाहेब जिजाबाई
पिता श्रीशहाजीराजे
केला संस्कार उदंड
देशभर कीर्ती गाजे --१
शिवनेरी किल्ल्या वर
शिवाजीचा जन्म झाला
यशवंत कीर्तिवंत
पुत्र भोसल्यांचा आला ---२
निश्चयाचा महामेरू
साऱ्या जनाचा आधार
पुण्यवंत नितिमंत
सांभाळती कारभार --३
हर हर महादेव
अशी घोषणा करत
घेऊसंगे मावळ्यास
लढा खंबीर लढत ---४
अफजल खान यांचा
हुशारीने वध केला
अन्यायाचा प्रतिकार
न्याय निवाड्याने झाला --५