क्रांतिवीर
क्रांतिवीर
शब्द पालवी सखी मंचसमुह स्टोरी मिरर यांच्या संयुक्त विद्यमान ने आयोजित स्पर्धा शब्द क्रांती
उपक्रम --काव्यलेखन
दि. १६/०२/२०२२
विषय -- मंगल पांडे
क्रांतिकारक मंगल पांडे
स्वतंत्रता वीर पहिले
१९ जुलै १८२७ ला जन्मले
जीवन देशासाठी वाहिले ---१
दिवाकर पिता
अभयराणी आई
थोर हा वीर पुत्राची
स्वातंत्र्यासाठी लढण्याची घाई ---- २
मांस गाईचे
बंदुकीतील कारतूससाठी
वापरण्यास दिला नकार
लढा दिला स्वातंत्र्यासाठी ---- ३
इंग्रजकडूनी मृत्यू नको म्हणुन
स्वतःच स्वतःवर गोळी झाडली
पण मृत्यू नाही आला
इंग्रजांनी अटक केली ----- ४
अत्याचारा विरुद्ध लढूनी
देशासाठी शाहिद झाला
८ एप्रिल १८५७ ला फाशी दिली
सलाम करूया या वीराला ---- ५
