शब्द अमृताचे बोल
शब्द अमृताचे बोल
शब्द हेचि अनमोल शस्त्र
करावा वापर नेहमी जपून
शब्दांच्या अयोग्य वापराने
मानवी मने जातात तुटून.....१
अद्वितीय देणगी मानवाला
जणू वरदानच ठरावे
माणसात वावरतांना सदा
वाणीवर नियंत्रण असावे.....२
ऋणानुबंध होती दृढ
मधूर व मधाळ वाणीने
शब्द अमृताचे बोल
नाते जोडती प्रेमाने....३
शब्दरूपी अमृतघड्याचा
उपयोग करावा सेवेसाठी
निस्वार्थपणे जगतांना
कार्य परोपकारासाठी.....४
मैत्रीभाव दृढ व्हावा
जगातील सर्व जीवांमध्ये
आदर्श ठरावे वागणुकीने
समस्त मानवजातीमध्ये....५
