प्रयत्नावाचुनी काही होणार नाही
प्रयत्नावाचुनी काही होणार नाही
स्वप्न पहावे प्रत्येकाने
पुर्ण करण्याची ठेवूनी आशा
झालो आपण अपयशी जरी
ठेवु नका रे तुम्ही निराशा
लढत रहावे प्रत्येकाने
जोपर्यंत तो जिंकत नाही
कित्येक वेळा आपण हरलो जरी
पण एकदा तरी हरणार नाही
नापास झालो परिक्षेत
तरी काई झाले नाही
कदाचित पास होण्याच्या लाईकीचे
आपण प्रयत्न केलेच नाही
मग दोष देतो त्या दगडाला
ज्याला कधी वाचा फुटणार नाही
माणसा सांगतो तुला पुन्हा आता
प्रयत्नावाचुनी काही होणार नाही
