STORYMIRROR

Sujit Mandade

Inspirational Others

3  

Sujit Mandade

Inspirational Others

माणूसकी दिसणार तरी कुठुन

माणूसकी दिसणार तरी कुठुन

1 min
148

अरे डोळ्यातले पाणी आटले

अश्रू येणार तरी कुठुन इथे

माणसे सुद्धा मुर्दाळ झालीत  

माणुसकी दिसणार तरी कुठुन

अरे त्या नागड्या मुलाला कपडे

द्यायला किसा रिकामा होता


म्हणे मग बियर बारमध्ये जाऊन

पारट्या करायलापैसा येतो तरी कुठुन

इथे माणसेसुद्धा मुर्दाळ झालीत  

माणुसकी दिसणार तरी कुठुन


अरे त्या चौकामध्ये एका नामर्दान स्त्रीच्या

अंगावर हात टाकला होता

कोणीही तिच्या मदतीला नाही आलेती

मोकळी झाली रडून इथे माणसे सुद्धा मुर्दाळ 

अरे दिवसें दिवस अत्याचार होतात


माझ्या मायलेकींवर अत्याचार होत असतांना

माझे मर्दगडी का जातात पळून इथे

माणसेसुद्धा मुर्दाळ झालीत  

माणुसकी दिसणार तरी कुठुन

अरे हात पाय नसलेला अपंग माणूस

मदतीची भिक मांगत होता


पण कुणा कडेच वेळ नव्हता

त्याच्याकडे बघायला वळून इथे

माणसेसुद्धा मुर्दाळ झालीत  

माणुसकी दिसणार तरी कुठुन

अरे इथल्या सगळ्या माणसांचे

मनस्वार्थाने लोभाने आणि गर्वाने भरले होते


अरे दया करुणा ममता

मदत गेली होती त्यांची मरून इथे

माणसेसुद्धा मुर्दाळ झालीत  

माणुसकी दिसणार तरी कुठुन  


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational