STORYMIRROR

Sujit Mandade

Others

3  

Sujit Mandade

Others

आस घेऊन गेला

आस घेऊन गेला

1 min
191

कोण म्हणतो माणूस मेल्यावर काही नेत नाही 

विचार माझ्या मायेला माझ्या बापन काय नेल नाही


अरे माझ्या बापन माझ्या मायेच 

कुंकू बांगडी चाळ जोडवे लावण्याचा अधिकार

नेला विधवेचा कलंक अपमान देऊन

सुवासिन म्हणुन भेटनारा मानसुद्धा नेला


अरे नवर्याच धीर हिंमत घेऊन गेला

मुलांना बाबा मनन्याचा अधिकार घेऊन गेला

मला आणि माझ्या आईला संघर्ष देउन गेला

आणि माझ्या आईच्या खांद्यावर जबाबदारी देउन गेला


अरे माझ्या आजी आजोबाच पोरगा नेला

जिवंतपणी त्या मातार्यांना मारून गेला

माझा लेक म्हातारपणाची काठी होईल

आशेवर जगणाऱ्याची आस घेऊन गेला


Rate this content
Log in