STORYMIRROR

Sujit Mandade

Others

2  

Sujit Mandade

Others

माणूसकी दिसणार तरी कुठून

माणूसकी दिसणार तरी कुठून

1 min
47

अरे डोळ्यातले पाणी आटले

अश्रू येणार तरी कुठून

इथे माणसेसुद्धा मुर्दाळ झालीत 

 माणुसकी दिसणार तरी कुठून


अरे त्या नागड्या मुलाला कपडे द्यायला

किसा रिकामा होता म्हणे 

मग बियर बारमध्ये जाऊन पारट्या करायला

पैसा येतो तरी कुठून

इथे माणसेसुद्धा मुर्दाळ झालीत 

 माणुसकी दिसणार तरी कुठून


अरे त्या चौकामध्ये एका नामर्दान

स्त्रीच्या अंगावर हात टाकला होता

कोणीही तिच्या मदतीला नाही आले

ती मोकळी झाली रडून

इथे माणसेसुद्धा मुर्दाळ झालीत 

 माणुसकी दिसणार तरी कुठून


अरे दिवसेंदिवस अत्याचार होतात

माझ्या मायलेकींवर 

अत्याचार होत असतांना

माझे मर्दगडी का जातात पळून

इथे माणसेसुद्धा मुर्दाळ झालीत 

 माणुसकी दिसणार तरी कुठून


अरे हातपाय नसलेला अपंग माणूस

मदतीची भिक मांगत होता

पण कुणाकडेच वेळ नव्हता

त्याच्याकडे बघायला वळून

इथे माणसेसुद्धा मुर्दाळ झालीत 

 माणुसकी दिसणार तरी कुठून


अरे इथल्या सगळ्या माणसांचे मन

स्वार्थाने लोभाने आणि गर्वाने भरले होते

अरे दया करुणा ममता मदत

गेली होती त्यांची मरून

इथे माणसेसुद्धा मुर्दाळ झालीत 

 माणुसकी दिसणार तरी कुठून


साहित्याला गुण द्या
लॉग इन