STORYMIRROR

Sujit Mandade

Fantasy Inspirational Others

3  

Sujit Mandade

Fantasy Inspirational Others

पुन्हा एक पाप

पुन्हा एक पाप

1 min
185

सोड देवाची रे भक्ती

देव आहे माय बाप

कर त्याची तु रे सेवा

मिटतील सर्व तुझे पाप


ज्याने जन्म तुला दिला

त्यालाच तु विसरला

देवाच्या भक्तीपाई 

माय बाप सोडून दिला


तू केली खरी भक्ती

पण देव नाही मिळाला

तो होता तुझ्यादारी

पण तुला नाही कळाला


जेव्हा कळले हो तुला

तेव्हा नव्हते माय बाप

तुझ्या भाळी लिहिला गेला

पुन्हा एक पाप



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy