विडंबन
विडंबन
दिवसा मागुनी दिवस चालले , ऋतू मागुनी ऋतू...
करोना कधी रे जाशील तू ... ।। धृ ।।
तनास दुखवुनी, चढे तापाचा पारा
सुकून जाई हा देहची सारा
जीव जगासी सोडून गेले, शांत कधी रे होसी तू... ।। १ ।।
सणवार सारे आले गेले
आनंदाला अजी, ग्रहण लागले
चंद्रकलेसम वाढत जाशी, अंतरी काय तुझ्या हेतू... ।।२ ।।
प्राणवायुची नुरली वावटळ
खोकला शरीरा, करीतो दुर्बळ
पुन्हा मनाला करसी, भयभीत का रे तू.... ।। ३ ।।
पुनरपी काढे, हळद दुधही घेतो
पुन्हा पुन्हा मी गुळण्या करितो
विनवणी तुज, आता तरी जा रे जगा सोडून तू ।। ४ ।।