Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Sankalpana Gaikwad

Comedy

3  

Sankalpana Gaikwad

Comedy

बायकोची कटकट

बायकोची कटकट

1 min
452


रोज ते बायकोच्या

तोंडाची वटवट

रिकामच केलं लगीन

मागं लावून घेतली कटकट 


लगीन झाल तवा पासून

बायकोन घरात बोलू नायी देलं

आफीसात साहेब अन्

घरात घरगडी केलं


गावच्या पोरीले फटफटीवर

आणाची एक डाव चुकी झाली

रोज पैदल जाण्याची

मंग मायावर बारी आली


पैदल जायाची राजेहो

मले लय्यच शरम येते

साहेब आज असे कसे

चपराशी रोज इचारते


दोस्तायचं झाल म्हणून

म्या बी केलं पटपट

रिकामचं केल लगीन

मागं लावून घेतली कटकट


म्या बी शोधला एक उपाय

लावला बयाच फोन

हलो, हलो, मॉडम मी आहे पैदल

तुमच्याच गाडीन रोज जाऊ आपण


हे सार आयकून बायको झाली बरी

अहो, हे घ्या फटफटीची चाबी

तुमच्या पोटाचा घेर वाढला होता भारी

म्हणून म्या तुमाले कराले लावली पैदलची वरी..


Rate this content
Log in