गौराईचे आगमन
गौराईचे आगमन
घर झाले आवरून
धुणी-भांडी धुवून
येणार आहेत गौराई माझ्या
पुतळी अन् गणेशाला घेऊन...
गौराईच्या आगमनाने
आतूर झाले साऱ्यांचे मन
दोघींनाही लाल, हिरवी पैठणी झाली घेऊन
पुतळीला झबले नी गणेशाला धोती टोपी घेऊन...
चिवडा, चकल्या, शंकरपाळे
लाळू, कडबोळ्यांनी डबे झाले भरून
आया-बाया साऱ्या मिळून
करंजी, अनारशानी फुलोरा झाला सजून....
लहान बाई हट्टी झाले तिला नटून
दोघीही सजल्या दिसतात लय भारी
हळद-कुंकवाच्या पावलांनी लक्ष्मी आली दारी
आंबील कतली प्रसादाची लज्जत लय न्यारी....
संध्याकाळचे वाजले सात
आरतीची झाली वेळ
नवनवीन लेकी सुनांनी
घातलाय गौराई खेळाचा मेळ...
झिम्मा, फुगडी, गाणी, ओवी
कित्ती कित्ती बाई करुया मज्जा
अडीच दिवसाच्या माहेराला
आलेल्या गौराई माझ्या सुखावून जातात बेज्जा...