मातृभूमी
मातृभूमी
1 min
629
आमच्या मातृभूमीचे आम्हा
अभिमान थोर मोठे
मातृभूमीला स्वातंत्र्य करण्यास
लढले विर नेते मोठ मोठे...
या मातृभूमीसाठी सांडले
अफाट रक्त विरांचे
बलिदान झाले कित्येक
मायच्या एकूलत्या एका लेकांचे....
मायभूमीसाठी जन्म देणाऱ्या
मायेचे पाश त्यांना कधी
आडवे आले नाही
तुरुंगवास, फाशी यांचे
त्यांना कधी नवल वाटले नाही...
वाघाच्या जबड्यात घालून हात
मोजली दात ही जात मराठ्यांची
पहा चाळून पाने आमच्या
मातृभूमीच्या पवित्र इतिहासाची..