जिवण
जिवण
जिवन जिवन म्हणजे काय असतं
कधी तुझ्या तर कधी माझ्या
जिवनात येणाऱ्या सुख दुःखाचा
आबट-गोड अनुभव असतं
जिवन जिवन म्हणजे काय असत
पंख लावून उंच भरारी घ्यायची
कि पंख छाटून जगायचं
आपले आपनच ठरवायच असतं
जिवन जिवन म्हणजे काय असतं
गजरा होऊन केसात मळायचं
कि फुल होऊन पायावर वाहायचं असतं
आपले आपणच ठरवायचं असतं
जिवन जिवन म्हणजे काय असतं
सुंदर अस स्वप्नाचं गाव असतं
नातीगोती प्रेम,जिव्हाळा असतं
किती प्रेम द्यायचं नी किती घ्यायचं
आपले आपनच ठरवायचं असतं
जिवन जिवन म्हणजे काय असतं
जगण्याला श्वास असतं
मरणाला स्मशान असतं
जगण्यासाठी मरावे कि
मरुन जगायचं असतं
आपले आपनच ठरवायचं असतं
जिवन जिवन म्हणजे काय असतं
थोड तुझ थोड माझ मानले
तर दुःख नाही तर सुखच सुख असतं